दिल्लीच्या धर्तीवर 'आप'च्या पर्वती मतदारसंघातील उमेदवाराचा जाहीरनामा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 October 2019

पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप सोनावणे यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत. 

'आप'चे उमेदवार सोनावणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या जाहीरानाम्याबाबत माहिती दिली. सोनावणे यांनी जाहीरनाम्यात शिक्षण, आरोग्य, पायाभुत सुविधा, महिला, युवक यांच्या प्रश्‍नांना प्राधान्य दिल्याचे सांगितले.

सोनावणे म्हणाले, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था प्रबळ करणे, रिक्षाचालकांचे आरटीओ परवाने देणे सुलभ करणे, समान दाबाने पाणी पुरवठा, कचरा व्यवस्था, शहराची सुरक्षितता, पर्यावरणाकडे अधिक लक्ष देणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विधानसभेत 'आरोग्य सेवा हक्क कायदा' राबविणे, दिल्लीच्या धर्तीवर 'मोहल्ला क्‍लिनिक'ची उभारणी, मतदारसंघात 10 हजार सीसीटीव्हींची जाळे बसवून महिलांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणार असून दर दोन किलोमीटरमध्ये सार्वजनिक शौचालये उभारणार आहे.'' 

याबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा प्रश्‍न सोडविण, नदी, नाले, टेकड्यांवरील अतिक्रमण थांबविणे, वार्डसभेसाठी कायदा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेकायदेशीर फ्लेक्‍सबाजी थांबविणे आणि विधानसभेचा वेळ स्वतःच्या वर्तनामुळे, गोंधळामुळे वाया न घालता जबाबदारीने वागण्याचेही आश्‍वासन सोनावणे यांनी दिले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Declaration of candidate from AAPs Parvati constituency on the backdrop of Delhi