श्रावणामुळे चिकन, मटण, मासळीच्या मागणीमध्ये घट

मटणाचे दर किलोमागे ४० रुपयांनी कमी झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
chicken mutton
chicken mutton

मार्केट यार्ड : श्रावणामुळे मासळी, चिकन आणि मटणाच्या मागणीत घट झाली. खोल समुद्रातील मासळीच्या भावात किलोमागे २० ते ३० टक्क्यांनी घट झाली. मटणाचे दर किलोमागे ४० रुपयांनी कमी झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी ५ ते १० टन, खाडीतील मासळी २०० ते ५०० किलो, नदीतील मासळी २०० ते ५०० किलो, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची मिळून ५ ते १० टन आवक झाल्याची माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. मटणाला मागणी कमी झाली असून भावात किलोमागे ४० रुपयांनी घट झाली असल्याचे मटण विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. चिकनच्या भावात किलोमागे २० ते ३० रुपयांनी घट झाल्याचे विक्रेते रूपेश परदेशी यांनी सांगितले.

chicken mutton
तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षाही धोकादायक! नीती आयोगाचा इशारा

खोल समुद्रातील मासळीचे भाव (प्रतिकिलोचे) : पापलेट : कापरी : १२००-१४००, मोठे १२००-१४००, मध्यम : ७००-८००, लहान २८०-४४०, भिला : ७००, हलवा : ४८०-६००, सुरमई : ४४०-५५०, रावस : लहान ५५०-६००, मोठा : ८००-८५०, घोळ : ५५०-६००, करली : २८०-३२०, पाला : ८००-९००, वाम : पिवळी : ४००-४८०, काळी २५०-३६०, ओले बोंबील : ६०-१६०, कोळंबी : लहान १६०-२४०, मध्यम २८०-३६०, मोठी ४००-५५०, जंबोप्रॉन्स : १०००, किंगप्रॉन्स : ७००, लॉबस्टर : ८००-१०००, मोरी : २४०-३२०, खेकडे : २००-२८० चिंबोऱ्या : ४००-९००.

chicken mutton
ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट, लहान मुलांसाठी धोक्याचा इशारा

खाडीची मासळी : नगली : ४८०, तांबोशी : ३२०-४००, बांगडा : २००-२८०, शेवटे १२०-२४०. तिसऱ्या : २००- २४०, खुबे : १००-१२०.

नदीची मासळी : रहू : १००-१६० कतला : १२०-१६०, मरळ : ३२०-४००, शिवडा : २००, खवली : २००, आम्ळी : १००,-१२० खेकडे : १६०-२००, वाम : ४८०.

चिकन : २००, लेगपीस : २४०, जिवंत कोंबडी : १५०, बोनलेस : ३००.

अंडी : गावरान : शेकडा : ८३०, डझन : १०८, प्रति नग : ९. इंग्लिश : शेकडा : ४२०, डझन : ६०, प्रतिनग : ५.

मटण : बोकडाचे : ६६०, बोल्हाईचे : ६६०, खिमा : ६६०, कलेजी : ७००.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com