Coronoavirus : पुणे, पिंपरीत खेळली शुद्ध हवा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

हवामान खात्याच्या नोंदणीनुसार दोन दिवसांत हवामानाची गुणवत्ता चांगली आणि समाधानकारक  होती. हवा प्रदूषणाबरोबरच आवाजाच्या प्रदूषणातही आज मोठी घट आढळली. 

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशभरात आज ‘जनता कर्फ्यू’चे आयोजन केले होते. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासनाच्या वतीने जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने आणि सेवा वगळता इतर सर्व आस्थापने बंद आहेत. त्याचा परिणाम पुणे, पिंपरीतील प्रदूषणाच्या पातळीवरही झाला आहे. रविवारी पुण्यात सर्वांत कमी प्रदूषणाची नोंद झाली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

  ‘जनता कर्फ्यू’मुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या नगण्यच  होती. त्यामुळे पाषाण, शिवाजीनगर, लोहगाव, कोथरूड, आळंदी,  निगडी, मांजरी व भूमकर चौक यांसारख्या भागांमध्ये हवेच्या प्रदूषणाची पातळी अत्यंत समाधानकारक होती.  हवामान खात्याच्या नोंदणीनुसार दोन दिवसांत हवामानाची गुणवत्ता चांगली आणि समाधानकारक  होती. हवा प्रदूषणाबरोबरच आवाजाच्या प्रदूषणातही आज मोठी घट आढळली. 

Video : पुणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease in pollution levels in pune and pcmc