

Tanisha Bhise Case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन अडचणीत सापडलेलं आहे. हे एक धर्मादाय रुग्णालय असल्याने शासनाने अटींच्या अधिन राहून ट्रस्टला जागा दिलेली होती. त्यातील एक अट म्हणजे रुग्णालयातील ६० टक्के खाटा ह्या गरीबांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे.