Deenanath Mangeshkar Hospital Case
esakal
Deenanath Mangeshkar Hospital Case : गर्भवती तनिषा भिसे (Tanisha Bhise Death) यांना वेळेवर वैद्यकीय उपचार व रुग्णवाहिकेची सुविधा न दिल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन संचलित) यांना पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयानं दोषी ठरवलं आहे. पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या नामांकित धर्मादाय रुग्णालयाविरोधात इतकी कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यात आलीये.