...तरच सगळे ठाकरेंच्या जवळ येतील; दीपक केसरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepak kesarkar balasaheb thackeray ideology uddhav thackeray shivsena politics

...तरच सगळे ठाकरेंच्या जवळ येतील; दीपक केसरकर

औंध : ‘‘बाळासाहेबांची विचारधारा ही त्यांची ताकद होती, ती मराठी माणसाशी जुळलेली होती. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कधीही स्वीकारले नसते. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी जे जुळत नाही, त्यापासून आधी लांब जायला लागेल, तरच सगळी दूर गेलेली माणसं उद्धव ठाकरेंच्या जवळ येतील,’’ अशी भूमिका शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मांडली. बालेवाडी येथील आर. के. लक्ष्मण म्युझियमच्या उद्‍घाटनप्रसंगी केसरकर आले होते.

त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. पुढे केसरकर म्हणाले, ‘‘बाळासाहेबांची ‘गर्वसे कहो हम हिंदू हैं’ ही एकच गर्जना होती. या विचारांनाच उद्धव ठाकरे यांनी फारकत दिली.’’तत्पूर्वी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्‍घाटन झाले. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आर. के. लक्ष्मण यांचे सुपुत्र श्रीनिवास लक्ष्मण, सून उषा लक्ष्मण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आदी उपस्थित होते.