दीपक कोचर यांना दिलासा

दीपक कोचर यांना दिलासा
Published on

दीपक कोचर यांना दिलासा
मुंबई, ता. १३ : आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती आणि व्यावसायिक दीपक कोचर यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ७८ कोटी रुपयांच्या मालमत्तेची जप्ती कायम ठेवणाऱ्या लवादच्या आदेशाला न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. न्यायालयाच्या निर्णयामुळे कोचर यांना दिलासा मिळाला. अंतरिम संरक्षणासाठी कोचर यांनी दिलेले कारण योग्य असल्याचे नमूद करून १९ जूनला होणाऱ्या पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत, जप्त केलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्यापासून खंडपीठाने ईडीला मनाई केली. जून २००९ ते ऑक्टोबर २०१२ या कालावधीत चंदा कोचर या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाच्या कंपन्यांना एकूण १,८७५ कोटी रुपयांची सहा मोठी कर्जे मंजूर केली होती.

Marathi News Esakal
www.esakal.com