पालखी मार्गावरील त्रुटी दहा जूनपर्यंत दूर कराव्यात - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Rajesh Deshmukh
पालखी मार्गावरील त्रुटी दहा जूनपर्यंत दूर कराव्यात - डॉ. राजेश देशमुख

पालखी मार्गावरील त्रुटी दहा जूनपर्यंत दूर कराव्यात - डॉ. राजेश देशमुख

पुणे - यंदाचा पालखी सोहळा आगळा वेगळा राहील यादृष्टीने सर्व नियोजन प्रभावीपणे करण्यात येईल. आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छतागृहे, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा अशा सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध कराव्यात. पालखीमार्ग, पालखी मुक्काम या ठिकाणच्या त्रुटी १० जूनपर्यंत दूर कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड. विकास ढगे-पाटील, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. पालखी सोहळा प्रमुखांकडून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांचा संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ. देशमुख म्हणाले, दोन वर्षानंतर पालखी सोहळा होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या राहण्याचा अंदाज असल्याचे राहणार आहे. भाविकांची कोणतीही अडचण होणार नाही, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी तीन-चार महिन्यांपासून पालखीबाबत नियोजन सुरू आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासोबत पालखी सोहळा प्रमुखांसमवेत बैठका घेऊन तसेच पालखी मार्ग, पालखी मुक्काम येथील पाहणी करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखणार

‘निर्मल वारी’ साठी आवश्यक सर्व प्रयत्न

यावर्षी दीडपट अधिक स्वच्छतागृहांची व्यवस्था

वीज, पुरेसे पाणी, आरोग्य व्यवस्थेचे नियोजन

पालखी मार्गावर रुग्णालयांतील खाटा आरक्षित

Web Title: Defects Palkhi Route Rectified By June 10 Dr Rajesh Deshmukh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top