
पुणे : डिफेन्स करिअर अकॅडमी संस्थेला केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने आणि सैनिकी स्कूल सोसायटीने केंद्रीय सैनिकी शाळा म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे संरक्षण दलात हजारो युवक-युवतींचे स्वप्न साकार करणाऱ्या या संस्थेने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. संस्थेचे अनेक विद्यार्थी लष्कर, नौदल व वायुदलात अधिकारीपदावर सध्या कार्यरत आहेत.