
देहू : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला आहे. त्यानिमित्त भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी लगबग सुरू आहे. यात ‘‘आरोग्य विभागातर्फे चार ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. सोबतच गावातील सात खासगी रुग्णालयांतील १० टक्के बेड रुग्णांसाठी राखीव आहेत,’’ अशी माहिती देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, डॉ. मेघा पदघने यांनी दिली.