देहूरोड उड्डाण पुलाचे काम संथगतीने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

पिंपरी - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या उड्‌डाण पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी वाहनचालकांची गैरसोय होत आहे. 

या उड्‌डाण पुलाच्या कामामुळे वाहनचालकांना देहूरोड गावातून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. हा रस्ता चिंचोळा असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. तळेगाव एमआयडीसीमध्ये जाणारे या रस्त्याचा वापर करतात. मात्र सतत होणाऱ्या कोंडीमुळे ते हैराण झाले आहे. 

गावातून जाणारा हा रस्ता खराब झाला आहे. त्यातच प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळेत वाढणारी वाहतूक यामुळे वाहन चालवणे कठीण जात आहे. परिणामी, या रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना बराच वेळ अडकून पडावे लागत आहे. 

वाहनचालक म्हणतात...
देहूरोड परिसरात रस्ते विकास महामंडळाकडून उड्‌डाण पुलाचे काम सुरू आहे. पावसाळ्यापासून या कामाचा वेग मंदावला आहे. उड्‌डाण पूल जेथे सुरू होतो, तेथेच बऱ्याचदा वाहने अडकून पडत असल्यामुळे चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे काम लवकर पूर्ण केल्यास सातत्याने होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
- मोहन पायगुडे

जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उड्‌डाण पुलाच्या कामामुळे देहूरोड परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. रस्ते विकास महामंडळाने पुलाचे काम लवकर मार्गी लावण्याची आवश्‍यकता आहे.
- जयराम लोणारी

Web Title: Dehuroad Overbridge Work Slow