Alandi News : आळंदीत वारीसाठी इंद्रायणी नदीवर स्काय वॉकजवळ बांधण्यात येणाऱ्या लोखंडी पुलाचे काम उशिराने सुरू असून प्रशासनाने त्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक केले आहे.
आळंदी : पालखी प्रस्थान वारीसाठी इंद्रायणी नदीवर स्काय वॉकला जोडून बांधण्यात आलेला फॅब्रिकेटेड लोखंडी पूल खरंतर आठवड्यापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही तसे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.