
पुणे : पुणे शहर सांस्कृतिक राजधानी आहे, तेथे कलाकारांचा सन्मान केला जावा यासाठी महापालिकेने बालगंधर्व पुरस्कार देण्यास सुरुवात केली. पण २०२० आणि २०२१ या वर्षातला पुरस्कार जाहीर करून चार वर्ष सरली तरीही महापालिकेला या पुरस्कारचे वितरण करण्याचा विसर पडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज (ता. १३) महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना यासंदर्भात निवेदन देऊन पुरस्काराची आठवण करून दिली आहे.