वरकुटे बंधारा बातमी तील कोट
चौकट
१५ वर्षे काम रेंगाळले
जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेंतर्गत माण नदीपात्रात ठिकठिकाणी २६ सिमेंट काँक्रिट बंधारे बांधण्याचे काम कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत करण्यात आले. त्यामध्ये वरकुटे- म्हसवड येथील या बंधाऱ्याचे बांधकाम अंदाजे १५ वर्षे संबंधित ठेकेदाराकडून रेंगाळले. यामुळे या बंधाऱ्याच्या बांधकामाचा खर्च वाढला. वाढीव खर्चाची तरतूद करून सहा कोटींहून अधिक खर्च करूनही अखेर या बंधाऱ्याचे बांधकाम समाधानकारक होऊ शकले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. पावसाळ्यात नदीच्या पुराच्या पाण्याने याबरोबरच भविष्यात जिहे-कठापूर योजनेचे पाणी अडविल्यास हा बंधारा फुटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे.
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

