
मुंबई : राज्यातील विद्यापीठे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक भरती रखडली असल्याने लवकरच सुरू होत असलेल्या शैक्षणिक वर्षांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीच संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राध्यापक भरतीवर लवकर तोडगा निघाला नाही तर नवीन शैक्षणिक सत्रात याचे परिणाम जाणवतील अशी भिती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.