दिल्ली विधानसभेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवेश

दिल्ली विधानसभेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवेश
Published on

दिल्ली विधानसभेत
‘एआय’चा प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ७ : ‘डिजिटल इंडिया’च्या ‘भाषिणी’च्या माध्यमातून दिल्ली विधानसभेत कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) प्रवेश केला आहे. सभागृहातील सदस्यांची भाषणांची लेखी नोंद घेऊन त्यांचे भाषांतर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रयोग करणारी दिल्ली विधानसभा ही देशातील पहिली विधानसभा ठरली आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने विधानसभेचे कामकाज किती अधिक चांगले आणि जलद करता येऊ शकते हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी म्हटले आहे. या पथदर्शक चाचणीचे सध्या मूल्यांकन करण्यात येत असून या प्रणालीची एकूण कामगिरी बारकाईने तपासली जाईल. चाचणीदरम्यान समोर येणाऱ्या त्रुटी किंवा अडचणी दूर केल्या जातील. मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे दिल्ली विधानसभेच्या गरजांनुसार त्यात सुधारणा करून नंतरच ते पूर्णपणे लागू करण्यावर निर्णय घेतला जाईल. ही प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली, तर विधानसभा आपल्या इतर विभागांमध्येही अशाच एआय आधारित प्रणालीचा वापर करण्यावर विचार केला जाईल, असे गुप्ता यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com