Pune Crime: दिल्लीतील व्यावसायिकाची रिक्षाचालकाकडून लूट
Pune News: दिल्लीतील ६९ वर्षीय व्यावसायिक भीमाशंकर दर्शनासाठी आल्यानंतर रिक्षाचालकाने चाकूचा धाक दाखवत १९,५०० रुपयांची लूट केली. घटना जंगलातील रस्त्यावर घडली असून आरोपी रिक्षाचालक पसार झाला आहे.
पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी आलेल्या दिल्लीतील एका ६९ वर्षीय व्यावसायिकास रिक्षाचालकाने चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे.