

सीजेपीचे दिल्लीत
आज पुन्हा आंदोलन
५७ मेट्रो स्थानकांवर प्रवेश-निर्गमन बंद; अनेक मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द
ॲग्रोवन वृत्तसेवा
नवी दिल्ली ः मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आज (ता. १०) दिल्लीतील जंतरमंतरवर पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि निर्गमन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या आणि तेथून सुटणाऱ्या अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दिल्ली पोलिसांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (डीएमआरसी) पत्र लिहून ५७ मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि निर्गमन बंद करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मान्य करत डीएमआरसीने संबंधित स्थानकांवरील प्रवेश-निर्गमन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती सामान्य होईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.
बंद ठेवण्यात येणाऱ्या स्थानकांमध्ये मध्य दिल्ली, नवी दिल्ली, जुनी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली आणि वायव्य दिल्लीतील अनेक स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित मेट्रो स्थानकांची स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. भारतीय रेल्वेने आज (ता. १०) पहाटे ४ ते दुपारी २ या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या सर्व मेल व एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. या दोन्ही स्थानकांच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, दिल्लीहून सुटणाऱ्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.