Indapur Crime News : इंदापूरच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना २५ लाख रुपयांचा गंडा...

१३ द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना गंडा..द्राक्ष वाहतुक व कॅरेट देणाऱ्याना व्यापाऱ्यांना ही फसवले...
delhi trader fraud with indapur farmer of 25 lakh police case on two accused
delhi trader fraud with indapur farmer of 25 lakh police case on two accusedSakal

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बोरी,बिरंगुडी,शेळगाव परीसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिल्लीच्या व्यापाऱ्याने गंडा घातला असून २५ लाख ८४ हजार ४७५ रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांचे पथक तपासासाठी दिल्लीला दाखल झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी श्रीकांत महावीर गायकवाड (रा. बोरी ) व मोहित कुमार(रा.दिल्ली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मोहित कुमार स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या मदतीने इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांची द्राक्षे विकत घेत होता.

त्याने बोरी,बिरगुंडी,शेळगाव परीसरातील दिलीप किसन शिंदे, सचिन लक्ष्मण शिंदे, सोमनाथ रामचंद्र धायगुडे , विजय मुकुंद शिंदे , आप्पा अनिल पाटील, मयुर चंद्रकांत पाटील , शुभम दत्तात्रेय ठोंबरे, गणेश बाळु देवकाते , मल्हारी विष्णु शिंदे , संजय भागवत लेंडे(रा.सर्व जण बोरी) , संतोष मच्छिंद्र भरणे (रा. बिरंगुडवाडी), सतिश जगन्नाथ जाधव,

सतिश उत्तम दुधाळ (रा.शेळगाव) तसेच सचिन सुभाष कुचेकर ९८ हजार ५०० रुपयांचे कॅरेट, सुनिल पाटोळे ,२७ हजार रुपयांचे कॅरेट, दत्तात्रेय शिंदे , गणेश ज्ञानदेव कचरे, एकनाथ उत्तम महानवर, अनिल रामचंद्र ठोंबरे यांचे ६४ हजार रुपयांचे वाहतुकीचे पैसे ठेवून पळ काढला असल्याची घटना घडली.

वालचंदनगर पोलिसांनी याप्रकरणी श्रीकांत गायकवाड व मोहित कुमार याच्यावर गुन्हा दाखल केला असून वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी तातडीने तपासासाठी पोलिस पथके दिल्लीला पाठवले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com