‘डियू’च्या निकालानंतर मिरवणुका काढण्यास मनाई

‘डियू’च्या निकालानंतर मिरवणुका काढण्यास मनाई
Published on

नवी दिल्ली, ता. १८ (पीटीआय) ः दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (डियूएससू) निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची विजयी मिरवणूक काढण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. ही बंदी केवळ रस्त्यांपुरती मर्यादित नसून दिल्ली विद्यापीठाच्या परिसरासह वसतिगृहांमध्येही लागू राहील, असे न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.
‘डियूएससू’साठी आज मतदान झाले. दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. निकाल शनिवारी (ता.१९) जाहीर होणार आहे. निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयूआय) यांच्यात मुख्य लढत होती. डाव्या विचारांच्या ‘आयसा-एसएफआय’ संयुक्त आघाडीनेही निवडणुकीत आव्हान उभे केल्याने लढत तिरंगी झाली
मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायाधीश तेजस करिया यांच्या खंडपीठाने निवडणूक नियमांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी सर्व विद्यार्थी संघटना आणि ‘डियू’च्या निवडणुकीतील सर्व १४० उमेदवारांना नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले. नियमभंगासाठी सामूहिक नुकसानभरपाई का ठोठावू नये, याचे कारणही त्यांना स्पष्ट करावे लागणार आहे.

ही गुंडगिरी नाही तर काय?
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाहनांच्या ताफ्यांसह नियमांचे कथित उल्लंघन झाल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही अशा प्रकारांना परवानगी कशी मिळाली, असा सवाल खंडपीठाने केला. ‘‘अशा वाहनांच्या ताफ्यांमुळे भीती, दहशत आणि वर्चस्वाची भावना निर्माण होते. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तुम्ही काय केले?’’ अशी विचारणा न्यायालयाने पोलिसांना केली.प्रचारादरम्यान उमेदवार मोटारींच्या छतावर आणि बोनेटवर उभे राहत असल्याच्या कथित प्रकारावरही न्यायालयाने कठोर टिप्पणी केली. ‘‘गुंडगिरी वेगळी काय असू शकते? देशाच्या राजधानीत यापेक्षा चिंताजनक काय असू शकते?’’ असा सवाल खंडपीठाने केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com