

Dr. Neelam Gorhe
esakal
पुणे - चाऱ्याची गरज असलेल्या गावांची तातडीने पाहणी करून गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी सोमवार (ता. १२) पर्यंत गावातच चारा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिल्या. दुष्काळी उपाययोजनांबाबत २५ सप्टेंबरला शासन निर्णय झाल्यानंतरही गंभीर दुष्काळग्रस्त भागात प्रशासनाकडून अद्याप पाहणी न झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.