बालमजूरी कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

कामगार उपायुक्त येथे बालमजूरी विरोध दिनाच्या कार्यक्रमामध्ये आर्कच्या मुलांनी कामगार उपायुक्त व्ही. सी. पनवेलकर यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सहायक कामगार आयुक्त भ. मा. आंधळे, समीर चव्हाण, चेतन जगताप, बाल हक्क कृती समितीचे मनीष श्रॉफ, कामगार नेते नितीन पवार, डॉ. विष्णू श्रीमंगले, विविध संस्थामधील पदाधिकारी व आर्क व्यासपीठामधील 50-60 मुले उपस्थित होती.

पुणे : बालमजूरी कायद्यामध्ये दुरुस्ती करून कोणत्याही प्रकारचे काम करणाऱ्या 18 वर्षाखालील व्यक्तीला बाल कामगार म्हणून संबोधले जावे. त्याचप्रमाणे कौटुंबिक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या 18 वर्षे खालील व्यक्तीला देखील बाल कामगार संबोधले जावे. अशी मागणी आर्क (बाल हक्क कृती समितीने ) केली आहे. 

कामगार उपायुक्त येथे बालमजूरी विरोध दिनाच्या कार्यक्रमामध्ये आर्कच्या मुलांनी कामगार उपायुक्त व्ही. सी. पनवेलकर यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सहायक कामगार आयुक्त भ. मा. आंधळे, समीर चव्हाण, चेतन जगताप, बालहक्क कृती समितीचे मनीष श्रॉफ, कामगार नेते नितीन पवार, डॉ. विष्णू श्रीमंगले, विविध संस्थामधील पदाधिकारी व आर्क व्यासपीठामधील 50-60 मुले उपस्थित होती.

गेल्या महिन्यापासून बालहक्क कृती समिती बालमजुरी विरोधात मोहीम राबवत आहे. या मोहिमे अंतर्गत विविध भागांतील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल देखील आर्क व्यासपीठाच्या मुलांनी उपायुक्त पनवेलकर यांच्याकडे सादर केला. 

बालहक्क कृती समितीने केलेल्या मागण्या, 
सर्व कायद्यामध्ये 18 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला मूल म्हणून संबोधले जावे.
18 वर्षापर्यंतच्या काम करणाऱ्या ( धोकादायक / बिना धोकादायक ) सर्व मुलांना बाल कामगार म्हणून संबोधले जावे. 
किशोरवयीन मूल जर काम करत असेल तर त्याचा देखील बाल कामगार या संज्ञेत समावेश करावा.
कौटुंबिक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या मुलाचा देखील बाल कामगार संज्ञेत समावेश व्हावा.

परंपरागत चालत आलेल्या कामांमध्ये आई-वडील, नातेवाईकांकडून मुलांचा कामांसाठी वापर होत आहे. यामुळे जात व्यवस्था घट्ट बनत आहे. त्यामुळे कौटुंबिक व्यवसायामध्ये मुलांचा वापर व्हायला नको असे बाल हक्क कृती समितीचे मनीष श्रॉफ बोलले.  न्यू व्हिजन, के.के.पी.के.पी., ग्रीन तारा, होप, आय.एस.सी., स्त्री मुक्ती संघटना, ग्रीन तारा, रेनबो फाउंडेशन, सेव्ह द चिल्डरण, माहेर, चाईल्ड लाईन या संस्थाचे प्रतिनिधी व मुले यावेळी उपस्थित होते.

Web Title: Demand for amendment in child labor laws