डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलनाला बंदी

डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलनाला बंदी
Published on: 

SLC26B30481

फोटोओळ :
सोलापूर ः जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना धनगर समाज क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पवन पाटील.

आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलनांना बंदी घाला
धनगर समाज क्रांती मोर्चाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर, ता. २ ः शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलने, धरणे, निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यास बंदी घालावी, अशी मागणी धनगर समाज क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पवन पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, पोलिस महासंचालक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सर्व समाजाचे प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थान आहे. यापूर्वी जिल्ह्यातील आंदोलने, मोर्चे आणि उपोषणे जिल्हा परिषद व पूनम गेट परिसरातील अधिकृत आंदोलनस्थळी होत होती. मात्र, अलीकडे काही संघटना आणि व्यक्तींकडून पुतळ्याच्या पायथ्याशी आंदोलने केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अशा आंदोलनांमुळे पुतळ्याचा अवमान होण्याची शक्यता असून वाहतुकीला अडथळा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच परिसरातील शांतता भंग होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुतळा परिसरात आंदोलनांना मनाई करून जिल्हा परिषद किंवा पूनम गेट येथील अधिकृत आंदोलनस्थळीच आंदोलने करण्याबाबत आदेश काढावेत, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.