पुण्यातील २३ लाख असंघटीत कामगारांना 3 हजार रूपये अनुदान देण्याची मागणी

पुण्यातील २३ लाख असंघटीत कामगारांना 3 हजार रूपये अनुदान देण्याची मागणी

येरवडा : पिंपरी- चिंचवड महानगरापलिकेने रिक्षा चालक, पथारी व्यवसायिक, घर कामगार महिला, केशकर्तनकार, बस चालक अशा असंघटीत कामगारांना प्रत्येकी तीन हजार रूपये अनुदान देण्या संदर्भात भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने सुद्धा असा निर्णय घेऊन शहरातील २३ लाख असंघटीत कामगारांना प्रत्येकी तीन हजार रूपये अनुदान देण्याची मागणी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका चाँदबी नदाफ यांनी केली आहे.

नदाफ म्हणाल्या, ‘‘ दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने संचारबंदी सदृश्‍य निर्बंध लागू केले आहेत. यात असंघटीत कष्टकऱ्यांची पुन्हा गेल्या वर्षी प्रमाणे होरपळ होत आहे. ती थांबविण्यासाठी केंद्र सरकार सोबतच स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महापालिकेने कष्टकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आले पाहिजे. पिंपरी- चिंचवड महापालिकेने असंघटीत कामगारांना प्रत्येकी तीन हजार रूपये देण्याची घोषणा करून स्थायी समितीत ते मंजूर ही केले आहे. हाच धागा पकडून पुणे महानगरपालिकेने समाजातील सर्व कष्टकरी जनतेला प्रत्येकी तीन हजार रूपये द्यावेत आणि देशात आदर्श घालून द्यावा.’’

पुण्यातील २३ लाख असंघटीत कामगारांना 3 हजार रूपये अनुदान देण्याची मागणी
महाराष्ट्रासाठी खुशखबर! सर्वांना मिळणार मोफत लस

शहरात जवळपास २३ लाख असंघटीत कामगार आहेत. त्यांना प्रत्येकी तीन हजार आर्थिक सहयोगाचा खर्च ६२० कोटी पर्यंत जातो. पुणे महानगरपालिकेच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात पथ सुधारणा विभागात महसुली आणि भांडवली खर्च मिळून १५६८कोटी (सेवकांवरील खर्च वगळून) दिलेले आहेत. विविध रस्त्यांचा विकास करणे, विश्रांतवाडी व खराडी चौकात उड्डाणपुल अशी कामे प्रस्तावित आहेत. रस्त्याच्या डागडुजीची कामे वगळता इतर सर्व नवीन कामे तत्काळ थांबविण्यात यावीत आणि पैसा कष्टकरी जनतेसाठी आर्थिक मदत म्हणून वापरण्यात यावा असे नदाफ यांनी स्थायी समितीला दिलेल्या ठरावात म्हटले आहे.

‘‘ महापालिकेच्या इतर विकास कामांपेक्षा मनुष्यचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील आर्थिक तरतुदीतील बदल आवश्‍यक ठरतो.’’

- चॉंदबी नदाफ, नगरसेवका, पुणे महानगरपालिका

सव्वाशे पेक्षा अधिक प्रकारचे असंघटीत कामगार

अगरबत्ती बनविणारे, चर्मकार, परीट,बेकरी, बॅंडवाले, बांगडी उद्योग, केशकर्तनवाले, कासार, बिडीकामगार, लोहार, विट भट्टी कामगार,बांधकाम मजुर, खाटीक, वेतकाम करणारे, पथारी, सिनेमा उद्योगातील कामगार, रस्ते तयार करणारे, कुरिअर काम करणारे, मोलकरीण, रंगारी,फुल, हार बनविणारे, पिठ गिरणी कामगार, हॉटेल कामगार, कुलूप-चावी बनविणारे, शिंपी, तमाशा कलावंत, भोई, कुंभार,खाण कामगार, कचरा वेचक, रिक्षा चालक, चौकीदा, माळी, गोंधळी, खेळणी तयार करणारे,शरीरविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, नाटक उद्योगातील पडद्यामागील सहायक कलाकार आदींचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com