esakal | संभाजी भिडेंना इस्रोचे प्रमुख करा; पंतप्रधानांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji-bhide.gif

पुणे शहर राष्ट्रवादी सरचिटणीस परीक्षित तळोकर यांनी संभाजी भिडेंना इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक करावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीं याना लिहले आहे. इतकेच नव्हे तर हे पत्र त्यांनी स्वतःच्या फेसबुक अकांऊटवरुन पोस्ट केले आहे. हे 'पत्र' सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे

संभाजी भिडेंना इस्रोचे प्रमुख करा; पंतप्रधानांकडे मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी सरचिटणीस परीक्षित तळोकर यांनी संभाजी भिडेंना इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक करावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीं याना लिहले आहे. इतकेच नव्हे तर हे पत्र त्यांनी स्वतःच्या फेसबुक अकांऊटवरुन पोस्ट केले आहे. हे 'पत्र' सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे

नुकतेच श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमेरिकेने एकादशीला यान सोडल्यामुळे चांद्रमोहिम यशस्वी झाली आहे असे वक्तव्य केले होते. यावर  परीक्षित तळोकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून भिडेंना इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.

''श्रीहरिकोटामधील सर्व सूत्र त्याच्या हाती गेल्यास पंचाग बघून पुढचा कार्यक्रम ठरवतील व थोड्याच दिवसात इस्रो अमेरिकेच्या नासा या संस्थेपेक्षा अव्वल ठरेल असा टोला त्यांनी या पत्रातून संभाजी भिडेंना लगावला आहे.

loading image