कोरोना काळातही पुणे विद्यापीठात अ‍ॅडमिशनसाठी डिमांड; 'एवढे' विद्यार्थी इच्छुक

Competition for admission in Pune University even during Corona period
Competition for admission in Pune University even during Corona period

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी देशभरातून २७ हजार ७८७ अर्ज दाखल झाले आहेत. पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १६ ऑगस्ट रोजी होणार आहे. तर पदव्युत्तर पदवीची परीक्षा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे नियोजन आहे. 

पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात ८१ पदव्युत्तर पदवी, १५ पदवी अभ्यासक्रम शिकवले जातात. तर, ६६ प्रमाणपत्र किंवा पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. याची क्षमता ५ हजार ६५३ इतकी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

यंदा कोरोनाच्या सावटाखाली यंदा प्रवेश परीक्षेचे नियोजन करण्यात आले. अंतीम वर्ष परीक्षा घेण्यात आलेली नसल्याने पदव्युत्तर पदवी प्रवेशाबाबत काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. अखेर १० आॅगस्ट रोजी ही मुदत संपली. 

पदवी व पदव्युत्तरची प्रवेश क्षमता ३ हजार ३५३ इतकी आहे. त्यासाठी २२ हजार ४६७ 
अर्ज आले आहेत. पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २ हजार ३०० असून, त्यासाठी २ हजार ६५०  विद्यार्थ्यांनी  अर्ज केले आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली.


ऑनलाईनची परीक्षा घरबसल्या होणार
पुणे विद्यापीठाने १५ पदवी अभ्यासक्रमासाठी १६ ऑगस्टला प्रवेश परीक्षा निश्चित केली आहे.  मुलांना त्यांच्या स्मार्ट फोनवर किंवा लॅपटॉपवर १ तासाची परीक्षा देता येणे शक्य होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. बॅचरल ऑफ व्होकेशनल (बी.व्होक), बीए लिबरल आर्टस्‌, संगीत, नृत्य, नाटक, बी.टेक एव्हिएशनसह अन्य पदवी अभ्यासक्रमासाठी परीक्षा होणार आहे. 

विद्याशाखानिहाय प्रवेश अर्ज व क्षमता
विज्ञान आणि तंत्रज्ञान : १७,१०४  - १३४२
वाणिज्य व व्यवस्थापन :  ११४४ - २२०
मानव विज्ञान : ४३७४ - ११७५
आंतरविद्याशाखीय अभ्यास : १८५६ - ६१६
पदविका व प्रमाणपत्र :  ३३०९ - २३००
एकूण अर्जाची संख्या : २७, ७८७ - ५,६५३
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com