ग्रामीण भागातील मागणी घटल्याने अर्थव्यवस्था संकटात : यशवंत सिन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

'शेतीतून शेतकऱ्यांना पुरेसे पैसे मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रोजगार कमी झाला आहे. त्यामुळे त्या भागात वस्तूंची खरेदी देखील कमी झाली आहे. त्याचा परिमाण मागणीवर झाला असून अर्थव्यवस्था संकटात आल्याचे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले.

पुणे : ''शेतीतून शेतकऱ्यांना पुरेसे पैसे मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रोजगार कमी झाला आहे. त्यामुळे त्या भागात वस्तूंची खरेदी देखील कमी झाली आहे. त्याचा परिमाण मागणीवर झाला असून अर्थव्यवस्था संकटात आल्याचे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले.

"गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स अँड इकॉनॉमिक'च्यावतीने सिन्हा यांचे 'इकॉनॉमिक स्लोडाऊन : स्ट्रक्‍चरल ऑर सायक्‍लिक' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.प्रा. संगीता श्रॉफ यावेळी उपस्थित होत्या.

सिन्हा म्हणाले, " शेती, बांधकाम आणि सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्रावर नोटाबंदी आणि जीएसटीचा मोठा परिमाण झाला आहे. कॉर्पोरेट कर कमी करणे भविष्यासाठी चांगले आहे पण त्यातून प्रश्‍न सुटणार नाहीत. गुंतवणूक व मागणी वाढली तर रोजगार वाढेल व ग्राहकांच्या खिशात पैसे येतील. ही एक सायकल आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand in rural areas leads to economy crisis Said Yashwant Sinha