पुणे विद्यापीठात डेंग्यू निर्मूलन व स्वच्छता मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पुणे महापालिकेच्या मदतीने १२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान 'डास निर्मूलन व स्वच्छता पंधरवडा' पाळला जाणार आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पुणे महापालिकेच्या मदतीने १२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान 'डास निर्मूलन व स्वच्छता पंधरवडा' पाळला जाणार आहे. त्यानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. 

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, ''शहरात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्याचा प्रादूर्भाव विद्यापीठात होऊ नये साठी विद्यापीठाच्या आवारात विशेष मोहीम हाती घ्यावी अशी सूचना कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केल्या होत्या. त्यानुसार १२ ते २६ नोव्हेंबर या काळात डास निर्मूलन व स्वच्छता पंधरावडा पाळला जाणार आहे. 

औषध फवारणी, धूरफवारणी (फॉगिंग), गवत व तण काढणे,  साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, गटारांची स्वच्छता, त्यांना झाकणे बसवणे, तळी तसेच, इतर नैसर्गिक जलस्रोतांमधील डासांची अंडी नष्ट व्हावीत म्हणून गप्पी मासे सोडणे, रद्दी व भंगार माल यांची विल्हेवाट लावणे अशी कामे केली जाणार आहेत.  यात विद्यार्थी, कर्मचारी, रहिवाशांचा सहभाग असणार आहे. कर्मचारी आणि संघटनांच्या प्रतिनिधी यांची २५ पथके तयार करण्यात येणार आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue eradication and hygiene campaign at the University of Pune