सावधान, डेंगीचा प्रादुर्भाव वाढतोय

सावधान, डेंगीचा प्रादुर्भाव वाढतोय
Published on: 

पिंपरी, ता. २६ : शहर-उपनगरांत डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या २५ दिवसांत ९० रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, यंदाच्या वर्षी एका महिन्यात आढळलेल्या डेंगी रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे, असे आरोग्य वैद्यकीय विभागाने सांगितले.

शहरात जून ते २५ ऑक्टोबर २०२६ या काळात २१२ जणांना डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पण, ‘‘वेळीच उपचार मिळाल्याने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही,’’ असा दावा प्रशासनाने केला आहे.
पावसाळा संपल्यानंतही शहरात विविध साथीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बहुतेक रोग हे दूषित पाणी, डास चावल्यामुळे होत आहेत. जिवाणू आणि विषाणू पांढऱ्या पेशींवर आक्रमण करतात. त्यामुळे पावसाळ्यात प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे डेंगी ताप, चिकुनगुनिया, अतिसार, व्हायरल फ्लू, इन्फ्लूएंझा, न्यूमोनिया आणि मलेरिया यांसारखे आजार प्रामुख्याने उद्भवत आहेत. साचणारे पाणी, परिसरातील अस्वच्छता आणि डासांची वाढ यांमुळे डेंगीचा धोका वाढतो आहे. तसेच चिकुनगुनियाचे २० संशयित आढळले असले, तरी एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही.

ज्या भागात डेंगीचे संशयित आढळतात, तेथे आरोग्य आणि वैद्यकीय विभागाचे कर्मचारी जाऊन तपासणी करत आहेत. डेंगी आणि मलेरिया नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन्ही विभागांकडून प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

डेंगी रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी
- घराच्या परिसरात तसेच छतावर, गच्चीवर आणि वापरात नसलेल्या भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये
- कुलर, पाण्याच्या टाक्या आणि इतर पाणी साठविण्याची ठिकाणे नियमित स्वच्छ ठेवावीत
- डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे
- ताप, डोकेदुखी, अंगदुखी किंवा इतर लक्षणे जाणवल्यास वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा


शहरातील मलेरिया आणि डेंगीचा अहवाल
महिना - तपासणी - पॉझिटिव्ह : तपासणी - पॉझिटिव्ह
मे - ३४,८५७ - ५ : ९५ - ०
जून - ३९,४४२ - १ : २५२ - २
जुलै - ४०,५४८ - २ : ५८० - १३
ऑगस्ट - ४२,८१० - ४ : ९५७ - ३७
सप्टेंबर - ४३,६७६ - ८ : १,५९३ - ७०
ऑक्टोबर - २९,४८३ - १३ : १,७२६ - ९०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com