दात दुखणे, किडणे, हिरड्यांचे आजार वाढले 

दीपेश सुराणा
बुधवार, 6 मार्च 2019

दातांची कशी घ्याल काळजी 
* दर सहा महिन्यांतून दंतवैद्यांकडून दातांची तपासणी करावी. 
* तंबाखू, गुटखा आदी व्यसनांपासून दूर राहावे. 
* चिकट, गोड आदी पदार्थ टाळावे. 
* लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या देऊ नयेत. 
* दिवसातून दोन वेळा दातांना ब्रश करावा. 

पिंपरी - दात किडणे, दात दुखणे, हिरड्यांचे आजार, व्यसनांमुळे होणारे दातांचे आजार सध्या बळावले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दररोज 70 ते 80 रुग्ण हे दातांच्या विविध आजारांसाठी तपासणी करून घेत आहेत. विशेषत- दात किडल्याने त्रस्त असलेले रुग्ण 15 ते 40 वयोगटांतील आहेत; तर 30 ते 55 वयोगटांत हिरड्यांच्या आजारांचे प्रमाण आढळत आहे. 

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत गोड आणि चिकट पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याशिवाय गुटखा, तंबाखू आदी व्यसन करणाऱ्या तरुणांना मुखकर्करोगाचा धोका संभवतो. दातांच्या आजारात प्रामुख्याने दाताला लागलेली कीड, दात दुखणे, हिरड्यांचा आजार आदींचा समावेश होतो. महापालिकेचे तालेरा व भोसरी रुग्णालय येथे देखील दातांवर उपचार केले जातात. विविध खासगी रुग्णालयांमध्ये देखील उपचार करून घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. महापालिकेच्या चव्हाण रुग्णालयात रूट कॅनॉल, दात काढणे, अक्कलदाढा काढणे, जबड्याच्या आणि हाडांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात; तसेच व्यसनांमुळे होणाऱ्या दातांच्या आजारावर देखील उपचार केले जात आहेत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे दंतरोग विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे म्हणाले, ""किडलेले, तुटलेले दात असतील, मुख दुर्गंधी जाणवत असेल, हिरड्यातून रक्त येणे, तोंडात जखमा असणे आदी लक्षणे आढळल्यास त्वरित दंतवैद्यांचा सल्ला घ्यावा. "फॅमिली डॉक्‍टर' या संकल्पनेप्रमाणे फॅमिली दंतवैद्य ही संकल्पना रुजणे अत्यंत आवश्‍यक आहे.'' 

दातांची कशी घ्याल काळजी 
* दर सहा महिन्यांतून दंतवैद्यांकडून दातांची तपासणी करावी. 
* तंबाखू, गुटखा आदी व्यसनांपासून दूर राहावे. 
* चिकट, गोड आदी पदार्थ टाळावे. 
* लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या देऊ नयेत. 
* दिवसातून दोन वेळा दातांना ब्रश करावा. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dental special day story