कृषी योजनांना मुहूर्त सापडला; शेतकर्‍यांनो, उचला मोबाईल अन् करा ऑनलाईन अर्ज!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

कृषी विभागाच्या वतीने नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर मे-जून महिन्यात कृषी यांत्रिकीकरण, विविध अश्वशक्तीचे ट्रॅक्टर, मळणी यंत्र, शेती अवजारे यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जातात.

शेटफळगढे (पुणे) : 'दै. सकाळ'च्या बातमीनंतर कृषी विभागाला जाग आली असून कृषी विभागाने सन २०२०-२०२१ या वर्षासाठी कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.

दरवर्षी सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर मे-जून महिन्यात कृषी यांत्रिकीकरण, विविध अश्वशक्तीचे ट्रॅक्टर, मळणी यंत्र, शेती अवजारे यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जातात. मात्र या वर्षी आर्थिक वर्ष सुरू होऊन सहा महिने झाले तरी कोणत्याही स्वरूपाच्या योजना राबवण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागितले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

मृत्यूनंतरही होतेय फरफट; प्रशासनाच्या लहरीपणामुळे अंत्यविधीला लागले सोळा तास​

याबाबत 'सकाळ'च्या ९ सप्टेंबरच्या अंकात 'शेतकऱ्यांसाठीच्या योजनांना मुहूर्त कधी? या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Department of Agriculture invited online applications from farmers for schemes of year 2021