राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय

शिक्षण विभागाने आता इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग दररोज पूर्ण क्षमतेने भरविण्यास, म्हणजेच १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी दिली
Department of Education decides to start schools in the state at full capacity pune
Department of Education decides to start schools in the state at full capacity pune Sakal

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शालेय शिक्षण विभागाने आता इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग दररोज पूर्ण क्षमतेने भरविण्यास, म्हणजेच १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय एप्रिल अखेरपर्यंत आणि शनिवारीही पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे गुरुवारी दिले आहेत.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून राज्यातील सर्व आस्थापना, कार्यक्रमांवरील कोरोना विषयक निर्बंध टप्प्या-टप्प्याने उठविण्यात येत आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२च्या शेवटच्या टप्प्यात शाळा पूर्ण क्षमतेने भरविण्याची सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सह सचिव झ. मु. काझी यांनी अध्यादेशाद्वारे दिली आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांमुळे मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. या शैक्षणिक वर्षात मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात. एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात.

तसेच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येतील, असेही काझी यांनी स्पष्ट केले आहे. इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावेत. सकाळच्या सत्रात शाळा घेणे आवश्यक असल्यास अध्यापनाच्या तासिका पूर्णवेळ शाळेप्रमाणे घेण्यात याव्यात, असेही काझी यांनी अध्यादेशात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com