डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

Students_Diploma
Students_Diploma
Updated on

पुणे : इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला तरीही दहावी-बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाला मुहूर्त सापडलेला नाही. हे प्रवेश कधी सुरू होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

बारावीचा निकाल १६ जुलै तर दहावीचा निकाल २९ जुलैला जाहीर झाला. १२वीच्या निकालास तर दोन पेक्षा जास्त आठवडे उलटून गेले तरी फार्मसी, हॉटेल मॅनेजेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी आणि सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली नाही. दहावी निकालनंतर तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्‍निक) प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र अजूनही याचे वेळापत्रक प्रतिक्षेत आहे.

दरम्यान, तंत्रशिक्षण विभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकियेस उशीर होत आहे, हे मान्य केले असले, तरी आणखी दोन ते तीन दिवस यासाठी लागू शकतील असे सांगितले. 

तंत्रशिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश नियमावलीत बदल केला आहे. यामध्ये दोन प्रवेश फेऱ्या होणार आहेत. डिफेन्सच्या राखीव जागांचे प्रमाण ५ जागा वरुन ५ टक्के जागा राखीव केल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Inauguration of the 38th Pune Festival by Vice President C.P. Radhakrishnan
Kasba Ganpati Installed in Houston, Texas for Golden Jubilee
Attempt to Murder Using Tractor in Malegaon Shivnagar
Opposition to Mess Price Hike and Demand for University Subsidy
Marathi News Esakal
www.esakal.com