
Ashadhi wari : आळे येथील पायीवारी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
आळेफाटा - श्री क्षेत्र आळे येथील वेद बोलविलेल्या रेडा समाधी मंदिराच्या पायीवारी दिंडी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान आज करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वेद बोलविलेल्या रेडा समाधी आळे (ता. जुन्नर) या ठिकाणी असुन गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाहून दरवर्षी श्री क्षेत्र आळे ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी निघत असते.
गेल्या दोन वर्षे कोरानाचा प्रार्दुभाव होता. त्यामुळे दिंडी सोहळा अतीशय मोजक्याच वारकऱ्यांमध्ये काढण्यात आला होता. परंतु या वर्षी अतीशय उत्साहात हा दिंडी सोहळा पार पडत असुन प्रस्थानाची महापुजा शिवनेर भुषण हभप राजाराम महाराज जाधव व सुदाम महाराज बनकर यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय काळे तसेच पंढरपूर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष गिरीश कोकणे, पंचायत समीतीचे माजी सदस्य नेताजी दादा डोके, जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या नयना डोके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्थान करण्यात आले.
या प्रसंगी उपाध्यक्ष संजय शिंदे, खजिनदार म्हतुजी सहाने सचिव अविनाश कुऱ्हाडे, चारूदत्त साबळे, संतोष पाडेकर, संजय खंडागळे, व्यवस्थापक कान्हु पाटील कुऱ्हाडे, विलास शिरतर, बाळासाहेब शेळके, गिरीश कोकणे, अँड. सुदर्शन भुजबळ, गोरक्ष गुंजाळ, बाळशिराम डावखर, गोरक्षनाथ दिघे, ज्ञानदेव सहाने, बाजीराव निमसे, प्रसन्न डोके, महेंद्र पाडेकर, माधव टकले,तसेच पालखी सोहळ्याचे कार्याध्यक्ष बाजीराव निमसे, उपाध्यक्ष नागेश कुऱ्हाडे, सखाराम कु-हाडे, पाडुरंग गाढवे, भगवान सहाने, संजय कुऱ्हाडे आदी मान्यंवर ग्रामस्थ, वारकरी उपस्थित होते.
दरम्यान हा दिंडी सोहळा आळे, राजुरी, बेल्हे, पारगाव, हाजी टाकळी, रामलिंग, निमाणे, इमाणगाव, दौड, काळेवाडी, भिगवण, पळसदेव, वनगळी, रांझणी देवाची, टेंभूर्णी, करकंब या गावांमध्ये मुक्काम करत दि. ९ जुलै रोजी पंढरपूरला जाणार आहे तसेच परतीच्या प्रवासात करकंब, शिराटळे, इंदापूर, पळसदेव, राजेगाव, निमगाव खलु, शिरसगाव, रामलिंग, जांबुत, बेल्हा आळे या ठिकाणी दि. २३ जुलै रोजी दिंडी सोहळ्याची सांगता होणार आहे.