Yemen Nationals : कोंढवा परिसरात पारपत्र आणि व्हिसाची मुदत संपलेल्या सात येमेन नागरिकांची बेकायदा वास्तव्यामुळे हकालपट्टी करण्यात येणार आहे. एफआरओ विभागाने ही कारवाई केली आहे.
पुणे : पारपत्र आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही कोंढवा परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या येमेन देशातील सात नागरिकांची हकालपट्टी करण्यात येणार आहे. शहर पोलिस दलातील विशेष शाखेच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून (एफआरओ) ही कारवाई करण्यात आली.