
विनावापर ऑक्सिजन सिलिंडर गोदामात जमा करा; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे - जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक, पुरवठा वितरक आणि रिफीलर्स यांच्याकडील अत्यावश्यक सेवा उद्योग वगळता इतर उद्योगाच्या ठिकाणी विनावापर पडून असलेल्या सिलिंडर गोदामात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
ऑक्सिजन उत्पादकांना ऑक्सिजनपैकी शंभर टक्के वापर मेडिकल ऑक्सिजन वापरासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग वगळून ऑक्सिजनचे ग्राहक असलेले सर्व उद्योग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या उद्योगांना होणारा लिक्वीड ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. कोविड रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. कोविड रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता असल्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत.
जम्बो आणि छोटे सिलिंडर बेकायदा अन्य कारणांसाठी वापरल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Web Title: Deposit Unused Oxygen Cylinders In Warehouse Collector Dr Rajesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..