अजितदादा म्हणतात, राज्याची आर्थिक स्थिती अवघड; पण...

ajit pavar
ajit pavar

बारामती (पुणे) : ""राज्याची अर्थव्यवस्था कमालीच्या अडचणीत आहे. "जीएसटी'मध्ये घट होत आहे. विकासदर घटला आहे. रुपयाचे अवमूल्यन होत आहे. महागाई वाढत आहे. अशा स्थितीत काम करताना जिद्द व चिकाटी ठेवून काम करावे लागेल. काम थोडे अवघड असले तरी, महाविकास आघाडीचे सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल,'' असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. 

उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल पवार यांचा बारामतीत आज नागरी सत्कार झाला. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, ""नियमित कर्ज परतफेड करणारे व दोन लाखांहून अधिक कर्ज घेतलेल्यांच्याही अपेक्षा आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच लक्ष घातले आहे. पोलिसांना 500 चौरस फुटांची घरे देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यातील कोणत्याही माध्यमांच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याबाबत लवकरच सरकार निर्णय घेईल. सर्वांचा याला पाठिंबा आहे. महाराष्ट्रात राहता, मग मातृभाषा यायलाच हवी.'' 

""पुरंदरच्या विमानतळाबाबत विरोध लक्षात घेत योग्य मोबदला देऊन, चर्चा करून विश्वासात घेऊन हे काम मार्गी लावायचे आहे. बारामती व पुण्यापासून हा विमानतळ 50 किलोमीटरवर येईल. त्याचा पश्‍चिम महाराष्ट्राला फायदा होईल. बारामती- फलटण रेल्वे भूसंपादन व पालखी मार्गाचे काम वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. बारामतीनजीक कॅन्सर हॉस्पिटलसाठी 25 एकर जागा शोधतो आहोत. नीरा डावा कालव्याच्या पाण्याबाबत अधिक बोलत नाही; मात्र, शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही,'' अशी ग्वाही पवार यांनी दिली. 

या वेळी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी 54 लाखांचा निधी प्रदान केला. या वेळी सुनेत्रा पवार, अमोल मिटकरी, विश्वास देवकाते आदी उपस्थित होते. 
 

माझ्या नावाचा वापर करून पोलिसांना किंवा इतर कोणालाही दमदाटी करू नका. सत्तेची नशा डोक्‍यात जाऊ देऊ नका. 
- अजित पवार, 
उपमुख्यमंत्री 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com