पुण्यात तीन जम्बो हॉस्पिटल तातडीने उभारावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी पवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये, यासाठी दक्षता घ्यावी. पुणे शहरासह जिल्ह्यातील ऑगस्टअखेरची स्थिती विचारात घेऊन गतीने आरोग्यविषयक पायाभूत सुविधांबाबत नियोजन करावे लागणार आहे. ​

पुणे: जिल्ह्यातील कोरोना बाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेवून तातडीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) यासह तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी पवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये, यासाठी दक्षता घ्यावी. पुणे शहरासह जिल्ह्यातील ऑगस्टअखेरची स्थिती विचारात घेऊन गतीने आरोग्यविषयक पायाभूत सुविधांबाबत नियोजन करावे लागणार आहे. शहरातील सीओईपी कॉलेज येथे सर्वाधिक बेड्सची क्षमता असलेले रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासोबतच एसएसपीएमएस, अण्णासाहेब मगर क्रीडांगण आणि सांगवी परिसरातील जागा निश्चित करण्याबाबत तांत्रिक समितीमार्फत तपासणी करण्यात येईल. गंभीर लक्षणांच्या रुग्णांना प्राधान्याने खाटा उपलब्ध कराव्यात. कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजना आणि मंत्रालयस्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील.

अकरावी अॅडमिशन : पहिल्या दिवशी 'इतक्या' विद्यार्थ्यांनी केले ऑनलाईन रजिस्ट्रेशन! 

महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, सहकार आयुक्त अनिल कवडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगांवकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

खासगी रुग्णालयांची बिले  लेखापरीक्षकांमार्फत तपासणार : 
खासगी रुग्णालयांकडून कोरोना बाधितांवर उपचारासाठी जादा बिले आकारल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. सरकारच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का, याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावे. याबाबत सबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. 

अकरावी अॅडमिशन : पहिल्या दिवशी 'इतक्या' विद्यार्थ्यांनी केले ऑनलाईन रजिस्ट्रेशन!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Instruct to to set up Three jumbo hospitals in Pune immediately