यंदा गणपती विसर्जन मिरवणूक निघणारच नाही!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

केंद्र सरकारने मोठ्या संख्येने लोक एकत्रित येतील, असे धार्मिक कार्यक्रम, शासकीय, राजकीय आणि मेळावे अशा कार्यक्रमांना परवानगी देऊ नका, अशा सूचना दिलेल्या आहेत.

Ganesh Festival 2020 : पुणे : "कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी आषाढी वारी, बकरी ईद, दहिहंडी असे सर्व सण-समारंभ मर्यादीत उपस्थितीत साजरे करण्यात आले. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्यात यावा,'' असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१४) केले.

गणेश विसर्जन घरगुती स्वरुपात करावे. यंदा विसर्जन मिरवणुकीला परवानगी देणार नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पवार यांनी सांगितले.

Independence Day 2020: देशाटनातून मातीशी नातं घट्ट करणारा कर्नल!

बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, "केंद्र सरकारने मोठ्या संख्येने लोक एकत्रित येतील, असे धार्मिक कार्यक्रम, शासकीय, राजकीय आणि मेळावे अशा कार्यक्रमांना परवानगी देऊ नका, अशा सूचना दिलेल्या आहेत. गर्दी होईल अशा कार्यक्रमांवर कठोर निर्बंध असला पाहिजे, अशी केंद्र आणि राज्य शासनाची देखील भूमिका आहे.

त्यानुसार गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात येणार नाही. प्रत्येक नागरिकांनी जबाबदारीने वागून काळजी घेतली पाहिजे. सर्व गणेश मंडळांकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे, असेही राव यांनी सांगितले केले. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक गणेश मंडळांना विश्‍वासात घेऊन जनजागृती करावी, असे आवाहनही पवार यांनी केले असल्याचे राव यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar clarified that ganesh visarjan miravnuk will not be allowed this year