
बारामती : गेल्या दोन दिवसात बारामती तालुका व शहरात झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. 26) पहाटेपासूनच बारामती शहर व तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे. पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती मिळतात रविवारी रात्री अजित पवार बारामतीत दाखल झाले आहेत. अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना तातडीने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.