'तडीपार करेन नाही तर, मोक्का लावेन'; अजित पवार गरजले

deputy cm ajit pawar warn money lenders
deputy cm ajit pawar warn money lenders

बारामती : मनगटशाहीच्या जोरावर जर बारामतीकरांना कोणी अडचणीत आणणार असेल आणि कायदा जुमानणार नसेल तर त्याला तडीपार करीन, मोक्का लावेन, मग तो किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची गय करणार नाही, अशा शब्दात आज सावकारीच्या प्रकरणावर अजित पवार गरजले. आपल्या नातेवाईक किंवा कुणी जवळचा असेल तर त्याला आजच या सावकारी प्रकारापासून दूर राहण्यासाठी समजून सांगा असा सल्ला द्यायलाही अजित पवार विसरले नाहीत.

बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. सावकारी प्रकरणाबद्दल आपण किती गंभीर आहोत हा संदेशच आज अजित पवारांनी बारामतीकरांना दिला. कोरोनानंतर आज प्रथमच एका जाहीर कार्यक्रमात अजित पवार बोलले आणि त्यांना विकासाबाबत बोलतानाच सावकारीबाबत आपली भूमिका अतिशय स्पष्ट शब्दात मांडली. कायदा हातात घेणा-यांची गय करणार नाही, सावकारीमध्ये कुणी अडकला असेल तर त्याची शिफारस करण्यासाठी माझ्याकडे यायचे नाही, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांनाही संदेश दिला. बारामतीच्या कायदा सुव्यवस्थेबाबत आपण किती जागरुक आहोत, हा संदेशच त्यांनी पोहोचविला. 

सहकार अडचणीत आणण्याचा केंद्राचा प्रयत्न
सहकारी बँकांसह इतर संस्थांवर केंद्राचे मोठ्या प्रमाणात निर्बंध येत आहेत. अनेक अडचणींना सहकारी संस्थांना सामोरे जावे लागत आहे, केंद्राचे धोरण सहकार अडचणीत आणण्याचे आहे असेच चित्र आहे. सहकारावर मर्यादा घालण्याचा हा प्रयत्न चुकीचा असल्याचेही अजित पवार म्हणाले. आज मोठ्या बँकांकडे पैसा मोठा आहे, पण खात्रीचा कर्जदार मिळत नाही आणि घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर बँकाही सावध भूमिका घेत असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com