Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कीर्तनकारांना गौरवपत्र
Warkari Tradition : वारकरी संप्रदायातील कीर्तन, प्रवचन, भजन सेवेला सन्मान देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजारो कीर्तनकारांना गौरवपत्र पाठवले आहेत. ही भावना भक्तीमूल्यांना दिलेला राजकीय सलाम आहे.
आळंदी : वारकरी परंपरेतील कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन यांसारख्या भक्तीमूल्यांचा सन्मान म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संप्रदायातील हजारो दिंडीकरी, फडकरी, कीर्तनकारांना गौरवपत्र पाठवले आहे.