कास - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतात....
विश्रांतीच्या काळातही उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘कृषी’ उत्साह
दरेतील शेतात केली ॲव्होकॅडोची लागवड; विविध पिकांची पाहणी
कास, ता. २२ ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या दरे या मूळगावी दोन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर आले आहेत. धावपळीच्या राजकीय जीवनातून थोडा वेळ बाजूला काढत उपमुख्यमंत्री शिंदेंनी आज सकाळीच आपल्या शेतात हजेरी लावली. यावेळी त्यांनी केवळ फेरफटकाच मारला नाही, तर प्रत्यक्ष राबून शेतात ॲव्होकॅडो या विदेशी फळझाडांची लागवड केली.
नेहमीच जनसेवेत व्यस्त असणारे उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या गावी आले, की पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात रमतात. रविवारी सकाळी त्यांनी दरे येथील आपल्या शेतात जाऊन विविध पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेत आधुनिक शेतीचा प्रयोग म्हणून ॲव्होकॅडोच्या रोपांची लागवड केली. शेतात काम करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता.
शेतात काम करत असतानाच त्यांनी उपस्थित पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ शेतीवरच नाही, तर पर्यटन आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘दरे हे माझे गाव असून, इथल्या मातीशी माझे अतूट नाते आहे. आज मी इथे ॲव्होकॅडोची झाडे लावली आहेत. आधुनिक शेतीची कास धरून आपण नवनवीन प्रयोग केले पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.’’
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शेतात ॲव्होकॅडोसारख्या फळाची निवड करून इतर शेतकऱ्यांनाही पारंपरिक शेतीसोबतच नगदी पिकांकडे वळण्याचा संदेश दिला आहे. सफरचंद, आंबा, फणस, काजू, जांभूळ, बांबू, आगरवूड, कॉफी, रक्तचंदन अशा प्रकारच्या पिकांचे प्रयोग यशस्वी झाल्याने या भागातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
04615
दरे : आपल्या शेतात वृक्षलागवड करताना एकनाथ शिंदे. (अर्चना पवार ः सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

