
Pune News : प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलिस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. फडके मूळच्या पुणे शहरातील असून, त्यांनी पिटा ॲक्टच्या गुन्ह्यात एका महिलेकडून चालवण्यात येणाऱ्या टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक (मोका) कायद्यान्वये कारवाई केली होती.
राधिका फडके सध्या चंद्रपूर पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस उपअधीक्षक (गृह) पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्या पुणे पोलिस आयुक्तालयात सायबर गुन्हे शाखेत वरिष्ठ निरीक्षक पदावर कार्यरत होत्या. कोथरूडच्या तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक फडके यांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध मोका कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
विशेष मोका न्यायालयाने वेश्याव्यवसाय आणि संघटित गुन्हेगारीच्या एका प्रकरणात महिलेसह आरोपींना सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ‘‘अनैतिक व्यापार (पिटा) च्या गुन्ह्यात मोका कायद्यान्वये राज्यातील पहिलीच कारवाई होती. पोलिस दलात सातत्य राखून कर्तव्य बजावले. आजपर्यंत निष्ठेने केलेल्या कामाची ही पावती आहे,’’ अशी प्रतिक्रिया फडके यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.