esakal | देश्ना नाहरचे एकाचवेळी स्केटिंगमध्ये नऊ विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Deshna Nahar
देश्ना नाहरचे एकाचवेळी स्केटिंगमध्ये नऊ विक्रम

देश्ना नाहरचे एकाचवेळी स्केटिंगमध्ये नऊ विक्रम

sakal_logo
By
प्रवीण डोके

पुणे - आव्हानांना स्वीकारायचे ठरवले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे देश्ना नाहरची स्केटिंगमधील विक्रमी नोंद. या चिमुकलीने वयाच्या केवळ सातव्या वर्षी ८१ तासात १० हजार ११६ फेऱ्या मारत स्केटिंगमध्ये नऊ प्रकारचे वेगवेगळे विक्रम केले आहेत.

बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब व रोट्रॅक्ट क्लब बेळगाव साउथमध्ये ‘८१ तास इन स्केरेथॉन फॉर प्रोमोशन ऑफ कोविड अप्रोप्रियट बिहेवियर’ स्पर्धा पार पडली. यामध्ये देश्नाने हे विक्रम केले आहेत. देश्नाला वयाच्या पाचव्या वर्षापासून स्केटिंगची आवड निर्माण झाली. तिने गेली दोन वर्ष रॉक ऑन व्हील्स स्केटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धांचा अनुभव पाठीशी घेऊन तिने कर्नाटक बेळगाव येथे झालेल्या स्पर्धेमध्ये नवीन विक्रम करत राज्यातील प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावली आहे.

बेळगाव येथील स्पर्धेत भारतभरातून २१० स्केटिंग खेळाडूंनी भाग घेतला होता. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, चेन्नई मधील खेळाडूंचा सहभाग होता. व्यवसायिक रसिक नाहर यांच्या नातीने देश्नाने या स्पर्धेत ८१ तासात १० हजार ११६ फेऱ्या मारून नवीन विक्रम तयार केला आहे. या विक्रमाची गणना केल्यास हा देश्नाने या स्पर्धेत एकाच वेळी नऊ विक्रम केले आहेत. या चिमुकल्या तरबेज खेळाडूला पुणे येथील प्रशिक्षक विजय मलजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. देश्ना ही पुणे येथील हचींग स्कुल मध्ये इयत्ता दूसरी मध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या या नव्या कर्तृत्वासाठी तिची आजी दया नाहर यांनीही अथक परिश्रम घेतले आहे. या कामगिरीसाठी तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा: Pune Corporation : अखेर इ कार भाड्याने घेण्याचा निर्णय

देश्नाला या खेळाची आवड आहे. तिला या खेळात निपुण होऊन गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तिच्या स्वप्नांना पालक म्हणून नेहमीच पाठिंबा देणार.

- आदित्य नाहर, देश्नाचे वडील

सातव्या वर्षी नऊ विक्रम बुकमध्ये नोंद :

इंडियन यंग बुक ऑफ रेकॉर्ड, बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड ,ग्लोबल रेकॉर्ड, नॅशनल रेकॉर्ड, एशिया बुक रेकॉर्ड, एशिया पॅसिफिक रेकॉर्ड, बेस्ट ऑफ एशिया रेकॉर्ड चिल्ड्रन रेकॉर्ड, एक्सट्रिम रेकॉर्ड

loading image
go to top