देशपांडे दांपत्याचे सामाजिक दातृत्व

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

प्रीती आणि कमलाकर बाळकृष्ण देशपांडे या दांपत्याने आजपर्यंत २२ लाख रुपयांची आर्थिक मदत विविध संस्थांना आणि व्यक्तींना दिली आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही ही मदत करत असल्याचे या दांपत्याने सांगितले.

पुणे - प्रीती आणि कमलाकर बाळकृष्ण देशपांडे या दांपत्याने आजपर्यंत २२ लाख रुपयांची आर्थिक मदत विविध संस्थांना आणि व्यक्तींना दिली आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही ही मदत करत असल्याचे या दांपत्याने सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बॅंक ऑफ महाराष्ट्रतील निवृत्त कर्मचारी असलेले कमलाकर यांनी सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ लाख २१ हजारांचा धनादेश ‘सकाळ रिलीफ फंडा’ला देऊ केला आहे. कमलाकर म्हणाले, ‘‘१९८० पासून स्टेट बॅंकेच्या पब्लिक प्रॉव्हिडंट खात्यावर मी दरवर्षी पैसे भरतो. तिथे साठविलेले पैसे आणि व्याजातून ही मदत करत आहे.’’ 

चाळीस वर्षांपासून कमलाकर फक्त सायकल वापरत होते. त्यापैकी सोळा वर्षे कामानिमित्त त्यांचा रोज तीस किलोमीटर प्रवास करावा लागत. २००५ मध्ये त्यांनी आपली सायकल गरजू व्यक्तीला दिली. तेव्हापासून ते पायी प्रवास करत आहेत. ‘‘समाजात घेण्याची वृत्ती वाढली आहे. ती थोडी कमी होऊन देण्याची वृत्ती वाढावी. असे झाले तर चांगले काम करणाऱ्या संस्थांना पैशाची कमतरता भासणार नाही,’’ अशी अपेक्षा कमलाकर यांनी व्यक्त केली. 

याआधी बिहार पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे निधी दिली आहे. माझ्या या सामाजिक कार्यात पत्नीचा नेहमी सहभाग असतो.
- कमलाकर देशपांडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deshpande couple social donation