Gas Cylinder Issue in kothrud
sakal
कोथरूड - कोथरूडमधील जीत मैदानाजवळ असलेल्या अजय गॅस एजन्सीसमोर गेल्या तीन दिवसांपासून आम्ही पहाटेपासून रांगेत उभे आहोत. मात्र, अद्याप गॅस मिळालेला नाही. 'आम्ही नोकरीला जावे की नाही? स्वयंपाक कसा करणार? गॅस देता येत नसेल तर सरकारने जेवणाचे डबे पुरवण्याची व्यवस्था करावी,' अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली.