Water Issue : पाणी असूनही डीएसके विश्ववासीयांच्या घशाला कोरड; महापौरांसह आयुक्तांकडे मांडले गऱ्हाणे

धायरी येथील डीएसके विश्व परिसरात उद्भवलेल्या तीव्र पाणीटंचाईबाबत नागरिकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला.
Water Scarcity

Water Scarcity

ESakal

Updated on

पुणे - धायरी येथील डीएसके विश्व परिसरात उद्भवलेल्या तीव्र पाणीटंचाईबाबत नागरिकांनी आज आक्रमक पवित्रा घेत पुणे महापालिकेच्या महापौर मंजूषा नागपुरे, आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन गऱ्हाणे मांडले. धरण १०० टक्के भरूनही येथील सोसायट्यांना कमी पाणी दिले जात असल्याने कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यावर पाणी वाढवून देऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com