Vidhan Sabha 2019 : पुरेसे पाणी देण्यासाठी कटिबद्ध : चेतन तुपे

chetan-tupe.jpg
chetan-tupe.jpg

Vidhan Sabha 2019 : हडपसर : नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करणे, मोकाट डूकरांचा प्रश्न सोडविणे, मतदार संघातील विकास आराखडयातील रस्त्यांचे काम मार्गी लावणे, मल्टीस्पेशालिटी रूग्णालय उभारणे, जलशुध्दीकरण प्रकल्प उभारणे, मुलांना खेळण्यासाठी उदयान व क्रीडांगणाचे काम हाती घेणे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी रस्ते तयार करणे, महापालिकेचे अधिकृत पार्कींग तळ उभारणे, यासाठी मी वचबध्द असल्याचे प्रतिपादन हडपसर विधानसभा मतदार संघातील महाअघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी केले.

हडपसर विधानसभा मतदार संघातील सय्यदनगर, चिंतामणीनगर, ईशा इम्पायर, सुभाष पार्क, गंगा व्हिलेज, रूणवाल सोसायटी, काळेपडळ, सातवनगर, गुलाम अलिनगर, ससाणेवस्ती तरवडेवस्ती, महम्मदवाडी, कृष्णानगर, जरांडेनगर या भागात मतदारांशी संवाद यात्रा काढली, याप्रसंगी तुपे बोलत होते.

प्रचारादरम्यान सय्यदनगर येथील मुस्लीम व हिंदू बांधवांनी, ''आम्ही तुपे यांच्या पाठीशी असून या निवडणूकीत त्यांना मोठया संख्येने निवडून आणूच'' असा विश्वास व्यक्त केला. तुपे यांच्या प्रचारा दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांनी तुपे यांना आर्शीवाद दिले. तसेच यावेळी मतदार संघात परिवर्तन होणार असल्याचे सुतोवाच केले. 

याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, फारुख इमानदार, नंदा लोणकर, मनोज घुले, कलेश्वर घुले, रुक्साणा इनामदार, शमशुद्दीन इनामदार, संजय बबन घुले, शोएब इनामदार, संजय शिंदे, मुबारक इनामदार, सुफियान इनामदार, जब्बार पठाण, प्रणय भोसले, इरफान शेख, जावेद शेख, मोहम्मद इनामदार, बाळासाहेब भिसे, सुरेखा लोणकर, महेश सातव, सोनू भैरट, राहुल साळवे, सचिन सातव, दत्ता शिंदे, अर्जुन बिनावत, कबीर शेख, सोहेल सय्यद, शाहिद मुलाणी, पुनम पाटील, शितल शिंदे, स्वाती चिटणीस, हसीना शेख, शालिनी जगताप, सीमा सावंत, वंदना मोडक, दिपाली कवडे, सुवर्णा हरपळे, शुभांगी लोणकर, तन्वी शेख, सुशीला गुंजाळ, वंदना बनकर, विजया भोसले उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com