बैलगाडा शर्यत रविवारी होणार

बैलगाडा शर्यत रविवारी होणार

Published on

राम सातपुते यांचा फोटो वापरणे.
---
‘देवाभाऊ केसरी’ बैलगाडा
शर्यतीचे आज आयोजन
सातपुतेंच्या वाढदिनानिमित्त पुरंदावडेत स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. ७ : माळशिरस तालुक्याचे माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदावडे (ता. माळशिरस) येथे ‘देवाभाऊ केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पहिल्या गोल रिंगणाच्या ठिकाणी रविवारी (ता. ८) सकाळी ९ वाजता या शर्यती सुरू होणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्यास ‘देवाभाऊ केसरी’ ट्रॉफीसह रोख २ लाख १ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी ट्रॉफीसह १ लाख ५० हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी ट्रॉफीसह १ लाख रुपये, चौथ्या क्रमांकासाठी ट्रॉफीसह ७० हजार रुपये, पाचव्या क्रमांकासाठी ५० हजार रुपये, सहाव्या क्रमांकासाठी ३० हजार रुपये, तर सातव्या क्रमांकासाठी २० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. सेमी फायनलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या गाडीला १० हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तिसऱ्या क्रमांकावरील गाडीला ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
या स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य व शासनाच्या नियमांनुसार पार पडणार असून, प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे आयोजन श्रीक्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान, पुरंदावडे- सदाशिवनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com